झेब्रा डव्ह

शास्त्रीय नाव: जिओपेलिया स्ट्रिआटा

बार्ड ग्राउंड डव्ह म्हणूनही ओळखला जाणारा झेब्रा डव्ह हा पक्षी कोलबिडे डव्ह परिवारातला आहे व मूळचा आग्नेय आशियातील आहे. हा लांब शेपटी असलेला लहान पक्षी आहे. काळा व पांढरा वगळता त्यांचा प्रामुख्याने तपकिरी-करडा असतो. हे पक्षी त्यांच्या हळूवार कूइंग कॉलसाठी ओळखले जातात.

झेब्रा डव्ह रात्रीच्या वेळी उंच झाडांवर झोपतात व प्रामुख्याने नारळाच्या झाडांवर झोपलेले दिसतात. मलय पेनिन्सुला, सुंदा बेटे व फिलिपिन्स येथे विशेषतः आढळतात. पाळीव म्हणून झेब्रा डव्ह लोकप्रिय आहेत व पक्षी पळून जात असल्याने वा जाणीवपूर्वक सोडले जात असल्याने अनेक पक्षी मूळ अधिवासाच्या बाहेरही आढळतात.