तोकान्स

शास्त्रीय नाव: रॅम्फेस्टिडे

मूळचे दक्षिण अमेरिकेतील असलेले तोकान्स पक्षी उष्णकटिबंधीय जंगले, उष्ण प्रदेशातील गवताळ प्रदेश व श्रब-लँड येथे राहतात. तोकान्स झाडांच्या पोकळ भागात घरटे करतात. ते अनेकदा वूडपेकर्सनी तयार केलेल्या व सोडलेल्या पोकळ भागात राहतात.

तोकान्स थव्यांमध्ये राहतात व हे थवे पाच ते सहा पक्ष्यांचे असतात. तोकान्स सर्वभक्षक (वनस्पती व प्राणी असे दोन्ही खाणारे) असतात. फळे हे त्यांचे मुख्य अन्न असून ते राहत असलेल्या रेनफॉरेस्टमधील झाडांवर फळे मुबलक आढळतात. हे पक्षी अंडी, किडे, लहान प्राणी, नट्स व रेप्टाइल्सही खातात.

तोकान पक्ष्यांचे पंख लहान असल्याने त्यांना फार लांबपर्यंत उडता येत नाही. परंतु, त्यामुळे या पक्ष्यांसमोर काही अडचणी येत नाहीत, कारण त्यांना फार लांब जायची आवश्यकता नसते. हे पक्षी रेनफॉरेस्टमधील झाडांच्या आसपास फिरतात आणि अन्न मिळवण्यासाठी अल्प अंतर कापतात.