शास्त्रीय नाव: अॅरॅटिन्गा सॉल्स्टिशिअलीस
सन कोन्युरे व सन पॅराकीट हा आकर्षक व देखणा पक्षी असून तो मूळचा दक्षिण अमेरिकेतील ईशान्य भागातील आहे. हा पक्षी मेक्सिको, दक्षिण व मध्य अमेरिका आणि अगदी वेस्ड इंडीज अशा जगाच्या निरनिराळ्या भागांत आढळतो.
हे पक्षी बुद्धिवान, मैत्रीपूर्ण व एकंदरच पाळीव पक्षी म्हणून चांगले असतात. त्यांना लोकांच्या अवतीभवती राहायला आवडते, या त्यांच्या आल्हाददायक स्वभावामुळे हे पक्षी पाळण्यासाठी उत्तम आहेत.
त्यांचे आयुर्मान अंदाजे 20 ते 25 वर्षे असते. सन कोन्युरेच्या पिल्लाची पिसे गडद हिरवी असतात आणि त्यानंतर अंदाजे 6 – 8 महिने वयापासून त्यांच्यावर अन्य रंगछटा दिसू लागतात.