सिल्व्हर फेझंट

शास्त्रीय नाव: लोफुरा नायस्थिमेरा

सिल्व्हर फेझंट (लोफुरा नायस्थिमेरा) ही फेझंटची जात आग्नेय आशियाच्या जंगलात, मुख्यत्वे डोंगरांत व पूर्व व दक्षिण चीनमध्ये आढळते. या पक्ष्याला हवाई येथे व अमेरिकेतील विविध ठिकाणीही नेण्यात आले आहे. नर काळा-पांढरा असतो व मादी प्रामुख्याने तपकिरी असते.

पक्षीपालनामध्ये हा पक्षी सर्रास दिसतो आणि वन्यजीवनातही अनेकदा आढळतो. नामशेष होऊ लागलेल्या जातींविषयी केलेल्या आययूसीएन रेड लिस्ट यादीमध्ये सिल्व्हर फेझंटचे मूल्यमापन लीस्ट कन्सर्न असे केले आहे.