स्कार्लेट मॅकॉ

शास्त्रीय नाव: अॅरा मॅकॉ

स्कार्लेट मॅकॉ हा मोठा लाल, पिवळा व निळ्या रंगाचा दक्षिण अमेरिकी पोपट आहे व मॅकॉज या निओट्रॉपिकल पोपटांच्या मोठ्या समूहाचा सदस्य आहे. हा पक्षी मूळचा दक्षिण अमेरिकेतील आर्द्र सदाहरित वनांतील असून, हा पट्टा वने आग्नेय मेक्सिको ते पेरुव्हिअन अॅमेझॉन, कोलंबिया, बॉलिव्हिया, व्हेनेझ्युएला व ब्राझीलपर्यंत आहे.

स्कार्लेट मॅकॉ पाळीव म्हणून 75 वर्षांपर्यंत जगू शकतात आणि त्यांचे साधारणतः आयुर्मान 40 ते 50 वर्षे असते. हे पक्षी जंगलांच्या शेंड्यांच्या बाजूला एकट्याने किंवा जोडीने फिरताना आढळतात, तर काही ठिकाणी ते थव्यांमध्ये दिसतात. ते क्ले लिक्सजवळ एकत्र गोळा झालेले दिसतात.[5] स्कार्लेट मॅकॉज प्रामुख्याने कर्कश्श आवाजात संवाद साधतात; परंतु, मौखिक संवादही अत्यंत वैविधयपूर्ण असते आणि पाळीव मॅकॉज काही वेळा मनुष्याच्या बोलण्याची नक्कलही करतात.