रेनफॉरेस्ट अधिवास
एस्सेलवर्ल्ड बर्ड पार्कमध्ये पक्ष्यांसाठी रेनफॉरेस्ट व तळ्यांपासून वाळवंट व खडकाळ डेक्सपर्यंत विविध प्रकारच्या भूप्रदेशांचा समावेश आहे. प्रत्येक पक्ष्याच्या विशिष्ट गरजांसाठी अचूक ठरेल असे पर्यावरण निर्माण करण्यासाठी पार्कातील हिरवागार क्षेत्र झाडे, फर्न, झुडुपे, पाण्यातील झाडे, वृक्षवल्ली यांनी व्यापला आहे. पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासासाठी पूरक ठरण्यासाठी विशेष रोपे व झाडांच्या अंदाजे 150 जाती लावण्यात आल्या आहेत. तसेच, रेनफॉरेस्ट धिवासाच्या मायक्रो क्लायमॅटिक इकॉलॉजिकल स्थिती निर्माण होण्यासाठी फॉगर्स व मिस्टर्सचीही तरतूद करण्यात आली आहे. पक्ष्यांसाठी अशा प्रकारच्या विशेष सुविधा उपलब्ध केल्यानंतर, एस्सेलवर्ल्ड बर्ड पार्कमध्ये प्रत्येक पक्ष्याला त्याची नैसर्गिक कौशल्ये विकसित करण्याची संधी दिली जाते.
- फर्न्स : रेनफॉरेस्टमधील मृत व सजीव झाडे व दगडांवरील एपिफिटीक झाडे व ग्राउंड कव्हर्सप्रमाणे दिसणाऱ्या झाडांमुळे पक्ष्यांचा अधिवास निर्माण होतो व झाडाच्या इकोसिस्टीमसोबत जुळवून घेता येते.
- झाडी व झुडुपे : यामुळे पक्ष्यांना खाद्य मिळते व झाडांचे वैविध्यही निर्माण होते.
- जमिनीवरील झाडे : ही झाडे पाणपक्षी व जमिनीवरील पक्ष्यांसाठी ताजे अन्न म्हणून मधाचा स्रोत, तसेच सेल्फ-हीलिंग औषधी वनस्पती ठरतात. काही दुर्मिळ झाडांच्या जाती जतन केल्या आहेत व काही नव्या जाती सध्याच्या पर्यावरणात समाविष्ट केल्या आहेत.
- पाणवनस्पती : पाण्यात राहणाऱ्या पक्ष्यांसाठी पाण्यातील अनुकूल वातावरण निर्माण व जतन करण्यासाठी पाण्यातील, तरंगती व सेमी-अॅक्वॅटिक झाडे.
- झाडे व वेली : पक्ष्यांना निवारा, खाद्य मिळावे, विसावता यावे म्हणून, तसेच पानगळ, बहर, फळे लागणे असे हंगाम दिसून येण्यासाठी, त्याचबरोबर, आर्द्रता, तापमान व सूर्यप्रकाश योग्य राखण्यासाठी, म्हणजेच पर्यावरण व पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संवर्धन करण्यासाठी देशी व विदेशी झाडांच्या जाती लावण्यात आल्या आहेत.
एस्सेलवर्ल्ड बर्ड पार्कमधील रेनफॉरेस्ट अधिवासाची काही ठळक वैशिष्ट्ये :
- व्हिक्टोरिया लिली : अंदाजे 3 मीटरपर्यंत (9.8 फूट) व्यास असलेले पान असलेले फूल, त्यावर लहान मुले बसू शकतात.
- ट्री फर्न्स : 145 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या, ज्युरासिक काळातले व भारतात अतिशय दुर्मिळ असलेले झाड बर्ड पार्कमध्ये लावलेले आहे.
- महाराष्ट्राचे मुख्य फूल : प्राइड ऑफ इंडिया (लेजरस्ट्रोमिया स्पेसिओसा) हे एस्सेलवर्ल्ड बर्ड पार्कमधील प्रमुख आकर्षण आहे.
- निवडुंगाचे प्रकार : ऑस्ट्रिचसाठी वाळवंटातील नैसर्गिक अधिवास निर्माण करण्यासाठी अंदाजे 20 प्रकारचे निवडुंग लावले आहेत.
ORCHIDS
NORFOLK ISLAND PINE
NERVE PLANT
NATAL PLUM
NASTURTIM
MOTHER - IN - LAWS TONGUE
MONKEY PLANT
MARIGOLD
MANGO
MAGNOLIA
ELEPHANT FOOT TREE
GLOD DUST DRACAENA
EASTER CACTUS
DRAGON TREE
DRACAENA VARIETIES
DONKEY TAIL & BURRO'S TAIL
DOGWOOD
DANDELION
CREEPING CHARLIE
CRABAPPLE
CORN PLANT
COLEUS
COFFEE TREE
CISSUS & KANGAROO VINES
CHRISTMAS CACTUS
CHICKWEEDS
BROMELIADS
BOUGAINVILLEA
BOSTON FERN
BOTTLE PALM
BEGONIA
BIRDS NEST FERN
BAMBOO
BABYS TEARS
AUSTRALIAN UMBRELLA TREE
ASPARAGUS FERN
ARECA
ALOE
AFRICAN VIOLETS
ACACIA
ZINNIA
ZEBRA PLANT
YUCCA
VELVET PLANT & PURPLE PASSION
WHITE CLOVER
WAX PLANT
WANDERING JEW
TOYO TREE & CALIFORNIA
THISTLE
THANKSGIVING CACTUS
SWEEDISH LVY
SPIDER PLANT & AIRPLANE PLANT
SNAKE PLANT
SENSITIVE PLANT
KALANCHOE
JADE PLANT
IMPATIENS
HONEYSUCKLE
HIBISCUS
HEN AND CHICKENS
GRAPE LVY
GOLD DUST
GARDENIA
BALL
ELK'S HORN