रीव्हेस फेझंट

शास्त्रीय नाव: सिरमॅटिकस रीव्हेसी

रीव्हेस फेझंट हा सिरमॅटिकस प्रजातीतील सर्वात मोठा फेझंट आहे. हा पक्षी चीनमध्ये लक्षणीय प्रमाणात आढळतो. त्याचे नाव ब्रिटिश नॅचरलिस्ट जॉन रीव्हेस यांच्या नावावरून ठेवले असून त्यांनी 1831 मध्ये या पक्ष्याचा नमुना युरोपात सादर केला.

रव्हेस फेझंट मध्य व पूर्व चीनमधील हिरव्यागार जंगलात मोठ्या प्रमाणात आढळतो. जिथे जिथे या पक्ष्यांना हलवण्यात आले तिथे त्यांनी वूडलँड्सजवळच्या शेतजमिनीत अधिवास केला. नर पक्ष्याची शेपटी दरवर्षी अंदाजे 30 सेमी (12 इंच) वाढते.

अधिवास नाहिसा होत असल्याने व अन्नसाठी अतिरिक्त शिकार होत असल्याने रीव्हेस फेझंटचे मूल्यमापन नामशेष होऊ लागलेल्या जातींविषयी केलेल्या आययूसीएन रेड लिस्ट यादीमध्ये व्हल्नरेबल असे केले आहे. वन्यजीवनात हे केवळ 2000 पक्षी उरले आहेत, असे म्हटले जाते.