शास्त्रीय नाव: इऑस बोर्निया
रेड लोरी (इऑस बोर्निया वा इऑस रुब्रा) ही सिटॅसिडे परिवारातील जात आहे. मोल्कास व इंडोनेशियातील सभोवतालच्या बेटांवर ही मोठ्या प्रमाणात आढळते. उष्णकटिबंधीय दमट सखल जंगल व उष्णकटिबंधीय खारफुटी जंगले हा त्यांचा नैसर्गिक अधिवास आहे.
पाळल्या जाणाऱ्या लोरींमध्ये रेड लोरीचे प्रमाण अधिक असते. हा पक्षी खेळकर असल्याने व सुंदर असल्याने रेड लोरी अनेक शौकिनांच्या व नवशिक्यांच्या पसंतीची आहे.
रेड लोरीज अत्यंत बुद्धिमान असतात व सक्रिय असतात. हे उत्तम पाळीव पक्षी आहेत. पण त्यांना सतत काहीतरी थरार हवा असतो, काही वेळा ते लहरी असतात.