रेन्बो लोरिकीट

शास्त्रीय नाव: ट्रिकोग्लोसस मोल्युकनस

नावातून सूचित होत असल्याप्रमाणे, हे पक्षी जगातील एक सर्वात रंगबिरंगी व सुंदर पक्षी आहेत. ते बहुतांश वेळ झाडांवर, फुलांतील पराग, रस, फळे, बिया व किडे खाण्यामध्ये व्यतित करतात. त्यांना विशेष अशी जिभ ब्रश-टिप्ड असते व त्यामुळे त्यांना फळांतील रसावर पोट भरता येते.

हे पक्षी ऑस्ट्रेलियातील पूर्व किनारा, पूर्व इंडोनेशिया, पापॉ न्यू गियाना, वनौतु, न्यू क्रलेडोनिया व सोलोमोन बेटांवर वनांमध्ये लहान समूहांत व मोकळ्या वनांमध्ये आढळतात.
रेन्बो लोरिकीट अतिशय दीर्घायुषी असू शकतात. वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत मादी प्रजनन करू शकतात आणि नरांची प्रजननक्षमता त्याहून अधिक असते. त्यांचे आयुर्मान सरासरी 25 ते 28 वर्षे असते.