मँडरिन डक

शास्त्रीय नाव: एक्स गॅलेरीक्युलाटा

पूर्व आशियात आढळणारा मँडरिन डक हा पर्चिंग डक प्रकार आहे. हा पक्षी मध्यम-आकाराचा, 41–49 सेमी (16–19 इंच) लांब असतो, तर पंख 65–75 सेमी (26–30 इंच) असतो. उत्तर अमेरिकेतील वूड डकशी त्याचा खास संबंध आहे. वन्यजीवनात हे पक्षी उथळ तळी, गवताळ प्रदेश वा तळी येथील घनदाट जंगलात प्रजोत्पादन करतात.

पाण्याच्या जवळ असलेल्या झाडंच्या मोकळ्या जागेत ते घरटे करतात आणि स्प्रिंगच्या दरम्यान मेटिंगनंतर मादी झाडाच्या पोकळ जागेत अंडी घालते. जमिनीवर चालत ते अन्न शोधतात.

या पक्ष्यांना ताजे पाणी आवडत असले तरी हे पक्षी किनारवर्ती पाणथळ जागा, नदीमुखाजवळही दिसतात. ते मुख्यत्वे वनस्पती, बिया, प्रामुख्याने बीच मास्ट खातात. काही वेळा ते किडे, लहान मासे, स्नेल्सही खातात. त्यांचे अन्न हंगामानुसार बदलते. पानगळ व हिवाळ्यामध्ये ते प्रामुख्याने धान्य खातात.