ग्रे क्राउन्ड क्रेन

शास्त्रीय नाव: बॅलिरिका रेग्युलोरम

ग्रे क्राउन्ड क्रेन हा क्रेनच्या ग्रुडे परिवारातला आहे. या पक्ष्याचे घरटे ओलसर अधिवासामध्ये आढळत असले तरी हा पक्षी सहाराच्या दक्षिणेला, आफ्रिकेत कोरड्या गवताळ प्रदेशात आढळतो. हे पक्षी दलदल, लागवडीखालील जमीन व युगांडा व केनयातील नद्या व तलावाजवळील गवताळ सपाट प्रदेश, दक्षिण आफ्रिकेचा अती-दक्षिण भाग येथे आढळतात. अचूक हवामानामुळे हे पक्षी स्थलांतर करत नाहीत.

हे क्रेन सर्वभक्षी असून वनस्पती, धान्ये, बिया, बेडूक, किडे, साप, लहान मासे, जलचरांची अंडी खातात. चालताना ते आपल्या पायाचे ठसे उमटवतात, झटपट पकडलेले व खाल्लेले किडे ते बाहेर टाकतात.

ग्रे क्राउन्ड क्रेन हा युगांडाचा राष्ट्रीय पक्षी आहे आणि त्याचा समावेश देशाच्या झेंड्यावर आहे. ग्रे क्राउन्ड क्रेन त्यांच्या रेंजमध्ये सर्रास आढळत असले तरी जलनिकास, किटकनाशकांचे वाढते प्रमाण, अति-चरणे यामुळे त्यांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे.