शास्त्रीय नाव: निम्फिकस होलांडिकस
कॉकेशिअल्स मूळचे ऑस्ट्रेलियाचे असून, ते प्रमाख्याने रुक्ष वा निम-रुक्ष देशामध्ये, पण नेहमी पाण्याच्या जवळ आढळतात. लक्षणीय प्रमाणात भटकी असलेली ही जात जेथे अन्न व पाणी उपलब्ध असेल तेथे जाते. पाळीव पक्षी म्हणून कॉकेशिअलचे आयुर्मान 16 ते 25 वर्षे असते. हे पक्षी 12 इंचापर्यंत (30 सेमी) वाढतात व त्यांचे वजन 3 ते 4 औंस असते. विविध कडधान्ये, बिया, फळे, भाज्या हे पक्ष्याचे मुख्य अन्न आहे.
कॉकेशिअचे प्रजनन हा अपूर्व अनुभव असतो. नेस्ट बॉक्स व थोडे साहित्य असल्यास कॉकेशिअल लगेच घरटे करतात. ते रोज एक अंड घालतात आणि अशी साधारण पाच अंडी घालतात. अंडी उबवण्याचा कालावधी 17 - 22 दिवस असतो. पिले बाहेर आली की 9व्या दिवशी ती डोळे उघडतात.
कॉकेशिअल तुलनेने व्होकल पक्षी आहेत. मादीपेक्षा नराचा आवाज अधिक वैविध्यपूर्ण असतो. त्यांना विशिष्ट गाणी म्हणण्यास शिकवता येऊ शकते. बहुतेकसे पोपटाप्रमाणे पण नेमके तसे नसलेल्या, कॉकेशिअलना त्यांच्या मालकाने बोलले शब्द बोलण्यास शिकवता येते.