शास्त्रीय नाव: मुसोफेगिड्स
दक्षिण आफ्रिकेत तुरोकाज व त्यासारखे दिसणारे पक्षी सरसकट लॉरिस म्हणून ओळखले जातात. ते सेमी-झायगोडेक्टीलस – चौथा (बाहेरचा) टो मागे व पुढे करता येऊ शकतो. या पक्ष्याचा दुसरा व तिसरा टो नेहमी पुढच्या दिशेने असतो, तर काही जातींमध्ये ते जुळलेले असतात.
मुसोफेगिड्सना ठसठशीत तुरा आणि लांब शेपटी असते; तुरोकाज विशिष्ट व खास रंगांसाठी ओळखले जातात, त्यांची पिसे गडद लाल व हिरवी असतात.
हा पक्षी उष्णकटिबंधीय पश्चिम आफ्रिकेतील स्थानिक ब्रीडर आहे. झाडावरच्या घरट्यात हा पक्षी दोन अंडी घालतो. झाडाच्या शेंड्यावरून चटकन नजरेत न येणारे हे पक्षी लांब शेपटीसह 43 सेमी लांब असतात.