गोल्डिअन फिंच

शास्त्रीय नाव: एरिथ्रुरा गोल्डी

गोल्डिअन फिंच हा कमालीचा आकर्षक असलेला व वेधक रंग असलेला पक्षी आहे. अनेक फिंचप्रमाणे या ऐटदार पक्ष्यालाही शेपटीला दोन पिसे असतात व ती टोकाशी निमुळती होत जातात. मादी गोल्डिअन फिंचचे रंग नरापेक्षा कमी गडद असतात व पिलांनाही त्यांच्या विविध रंगांवरून ओळखता येते. पिलांनाही त्यांच्या रंगांवरून ओळखता येते, त्यांचे डोके, मान, बाजू करड्या असतात व पाठ, पंख, शेपटीची पिसे ऑलिव्ह-ग्रीन असतात. पिले मोठी होऊ लागली की त्यांचे रंग बदलू लागतात.

गोल्डिअन फिंच उत्तर ऑस्ट्रेलियात, प्रामुख्याने नॉर्दन टेरिटरीच्या वायव्य भागात व पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या किम्बर्ले भागात लक्षणीय आढळतात. हा पक्षी काही वेळा क्वीन्सलँडमध्येही दिसला आहे.