गोल्डन मँटल्ड रोसेला

शास्त्रीय नाव: प्लॅटीसेरकस एक्झिमिअस

सहसा इस्टर्न रोसेला व व्हाइट-चीक्ड रोसेला म्हटले जाणारे गोल्डन-मँटल्ड रोसेला पक्ष्यांचे मूळ ऑस्ट्रेलियामध्ये आहे आणि ते रोसेला परिवारातील सर्वात रंगी व लोकप्रिय पोपट आहेत. इस्टर्न रोसेला मूळचे ऑस्ट्रेलिया खंडाच्या आग्नेय भागातले व टास्मानियातील आहेत.

न्यूझीलंडमध्ये हा पक्षी दाखल झाल्यावर तो दक्षिण बेटामधील ड्युनडिनसभोवतीच्या टेकड्यांमध्ये व उत्तर बेटांवर आढळला. रोसेलांची ड्युनडिनमधील संख्या नेहमीच कमी राहिली आहे. याचे एक कारण म्हणजे, हे पक्षी पकडले जातात व केज बर्ड म्हणून विकले जातात तसेच त्यांच्या मूळ अधिवासाच्या तुलनेत हवामान कमालीचे थंड आहे.

इस्टर्न रोसेला खुल्या वूडलँड्समध्ये, गवताळ प्रदेशात, शेतात व बुशलँडमध्ये दिसतात. उद्याने, बागा व गोल्फ कोर्स अशा शहरी अधिवासातही दिसतात.