एक्लेक्टस पॅरट

शास्त्रीय नाव: एक्लेक्टस रोरॅटस

या जातींमध्ये व्हिजिबल लाइट सेक्श्युअल डिमॉर्फिजम आढळते, म्हणजेच मादींच्या तुलनेत नरांचा रंग वेगळा असतो आणि ठळकपणे वेगळा असतो नरांचा रंग हिरवा, निळा व पिवळा असतो, तर मादींचा रंग गडद लाल व जांभळा असतो.

त्यांचे आयुष्य अंदाजे 30 ते 40 वर्षे असते. विविध प्रकारच्या बिया, दाणे, बेरी, फळे, पानांचे अंकुर, बहर व फुलांमधला रस हे त्यांचे खाद्य आहे. हे पक्षी छोट्या थव्यांमध्ये किंवा जोडीने राहतात. दिवसा ते थव्याने खाद्य शोधतात. फळांची किती झाडे उपलब्ध आहेत यावरून तेथे जमणाऱ्या त्यांच्या थव्याचा आकार ठरतो. रात्रीच्या वेळी, त साधारण 80 पक्ष्यांपर्यंतच्या समूहाने विश्रांती घेतात.