चॅटरिंग लोरी

शास्त्रीय नाव: लोरिअस गॅरूलस

चॅटरिंग लोरी हा जंगलात राहणारा पक्षी असून उत्तर मलुकु, इंडोनेशिया येथे मोठ्या प्रमाणात आढळतो. या पक्ष्यांना सतत धोका असतो. त्यातील प्रमुख केज-बर्ड व्यापाराकडून असतो. रंगबिरंगी चॅटरिंग लोरी हा लोकीचा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. हा पक्षी दिवसभर आवाज करत असल्याने त्याचे चॅटरिंग लोरी हे नाव अतिशय सार्थ आहे.

हे पक्षी त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी नावाजले जातात व सतत काहीतरी करत असतात. त्यांच्या पिंजऱ्याच्या सर्वात वरच्य टोकावर काही ठेवले असेल तर ते खाली आणेपर्यंत ते प्रयत्न करत राहतात.

त्यांचे आयुर्मान अंदाजे 20 वर्षे असते. ताजी फळे, भाज्या व कडधान्ये हे त्यांचे मुख्य अन्न आहे. फुलांमधील रसाचे सेवन केल्याने चॅटरिंग लोरीजची विष्ठा पातळ असते.