शास्त्रीय नाव: इऑस रेटिक्युलेट
ब्लू-स्ट्रेक्ड लोरी हा मध्यम अकाराचा पोपट असून त्याची लांबी अंदाजे 12 इंच किंवा 31 सेमी (लांब शेपटीसह) व वजन 5.1 - 5.4 oz. (145 - 155 ग्रॅम) असते.
लोरीकीट्स त्यांच्या अन्नाच्या ठिकाणांपर्यंतचा रोजचा मार्ग प्रस्थापित करतात. हा मार्ग टेकड्या, दऱ्या, नद्या अशा नैसर्गिक ठिकाणांतून जातो. रात्रीच्या वेळी लोरी पक्षी याच मार्गाने ते झोपण्याच्या ठिकाणी परत येतात, जेथे हजारो पक्षी असतात.
हे पक्षी फळे, बिया, कोंब, फुलांतील रस, न पिकलेले धान्य व परागकण खातात आणि वन्यजीवनात त्यांचे आयुष्य 15 ते 30 वर्षे असते, तर पाळीव पक्षी 28 ते 32 वर्षे जगतात.