ब्लु गोल्ड मॅकॉ

शास्त्रीय नाव: अॅरा अॅरारुना

हा दक्षिण-अमेरिकन पक्षी मॅकॉज नावाने ओळखल्या जाणाऱ्या निओट्रॉपिकल पक्ष्यांच्या मोठ्या समूहाचा सदस्य आहे. हे पक्षी मध्य व दक्षिण अमेरिकन मॅकॉजच्या सहा पोटजातींपैकी एक आहेत.

वन्यजीवनात त्यंचे वय अंदाजे 30 ते 35 वर्षे असते. निळा-व-पिवळा मॅकॉ फळाचे कवच फोडण्यासाठी, तसेच झाडावर चढण्यासाठी व लटकण्यासाठी त्याच्या शक्तिशाली चोचीचा वापर करतो.

हे पक्षी अतिशय बुद्धिमान व सामाजिक असतात. त्यामुळेच मालकांशी त्यांचे घट्ट नाते निर्माण होते. या पक्ष्यांची आवश्यक काळजी घेतल्यास ते उत्तम व प्रेमळ कम्पॅनिअन पोपट ठरतात.