ब्लॅक-नेक्ड स्वॅन

शास्त्रीय नाव: सायग्नस मेलान्कॉरिफस

नावातून सूचित होत असल्याप्रमाणे, काळ्या रंगाची मान असलेला हा मोठा पांढरा हंस आहे. प्रजोत्पादनाच्या काळात नर हंसांमध्ये, जबड्याच्या वरच्या भागात असलेला रेड नॉब वा काळपुळी मोठा होतो. ब्लॅक-नेक्ड स्वॅनचे पंख आखूड असतात, पण तरीही ते वेगाने उडतात. ते शाकाहारी असतात आणि मुख्यत्वे पाण्यातील वनस्पतींवर जगतात.

त्यांचे आयुर्मान 10 ते 30 वर्षे असते. हे पक्षी फॉकलँड बेटांसह दक्षिण अमेरिकेत्या दक्षिण भागात आढळतात. पाणथळ जागा, ताज्या पाण्याचे खाजण, खाऱ्या पाण्याची जागा, उथळ तळी येथे त्यांचा अधिवास असतो.