शास्त्रीय नाव: लोरिअस लोरी
ब्लॅक-हेडेड लोरीला वेस्टर्न ब्लॅक-कॅप्ड लोरी किंवा ट्रायकलर्ड लोरी असेही म्हणतात. पे पोपट न्यू गियाना व आसपासच्या लहान बेटांवर आढळतात. हे रंगीत व तुलनेने मजबूत लोरी असतात.
हे पक्षी साधारणतः सर्वत्र आढळतात, परंतु त्यांची सियानुचन ही प्रजात तुलनेने दुर्मिळ असूनन 5000 हून कमी शिल्लक आहेत. त्यांच्या अन्नामध्ये परागकण, फुलांतील रस, फुले, फळे व किडे यांचा समावेश असतो व ते सहसा जोडीजोडीने आढळतात, क्वचित 10 किंवा त्याहून अधिक थव्यामध्ये दिसतात.
ब्लॅक हेडेड लोरीज काही वेळा बोलायलाही शिकतात. त्यांना सभोवती फिरणे आणि काही वेळा पिंजऱ्यात पाठीवर पहुडणे त्यांना आवडते.