एस्सेलवर्ल्ड बर्ड पार्कविषयी

पक्ष्यांशी जीवनभराची मैत्री करा!

तुम्ही त्यांना टीव्हीवर पाहिले असेल किंवा व्हर्च्युअल विश्वात. गोष्टींमधून तुम्ही त्यांच्याविषयी ऐकले असेल. इथे या आणि त्यांना व्यक्तिशः भेटा, त्यांच्याशी बोला आणि त्यांच्याशी मैत्री करा.

भारतातील पहिले अनोखे व संवादात्मक बर्ड पार्क असलेले व अशा प्रकारचे पहिलेवहिले एस्सेलवर्ल्ड बर्ड पार्क पक्षीविश्वातील अतिशय आकर्षक ठिकाणे व आवाज यांच्या नजिक नेते. आमचे बर्ड पार्क म्हणजे उड्डाणाच्या तयारीत असलेल्या, जमिनीवर राहणाऱ्या व पाण्यात राहणाऱ्या अंदाजे 50 जातींच्या 400 परदेशी पक्ष्यांचे घर आहे. आफ्रिकन ग्रे पॅरट, ब्लू गोल्ड मॅको, कॉकेटिएल, रेन्बो लॉराकीट, तौकान, चॅटरिंग लोरी, सन कोन्क्युरे, कॅलिफोर्निया क्वेल, गोल्डन फेझंट, शहामृग, ब्लॅक स्वॅन, कॅरोलिना वूड डक व क्राउन्ड क्रेन हे पार्कमधील प्रमुख पक्षी आहेत.

एस्सेलवर्ल्ड बर्ड पार्कमध्ये तुम्हाला केवळ पाहण्याची व निरीक्षण करण्याचीच नव्हे, तर पक्ष्यांच्या जादूई विश्वात रममाण होण्याची व त्यांच्या नैसर्गिक अधिवासात त्यांच्याशी संवाद साधण्याचीही संधी मिळते. पक्षी संवर्धनाचे महत्त्व जाणणाऱ्या एस्सेलवर्ल्डने पक्ष्यांची जास्तीत जास्त काळजी घेण्यासठी व त्यांचा नवा अधिवास नैसर्गिक व संवेदनशील पद्धतीने जतन करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली आहे.

मुख्य आकर्षणे

  • फीडिंग डेक : परदेशी पक्ष्यांना स्वतःच्या हाताने खाणे भरवण्याचा अनुभव घ्या!

  • फ्लॅप-एन-स्नॅप : तुमच्या आवडत्या पक्ष्यांसोबत फोटो काढून घ्या!

  • वूडपेकर्स स्टेडिअम : आकर्षक पक्षी खुल्या जागेत संवाद साधत असतानाचा अपूर्व अनुभव घ्या!

  • लेकलेट : या सुंदर अॅक्वास्केप्ड लेकमध्ये पाणपक्ष्यांची झलक पाहा!

  • इसल ऑफ आफ्रिका : आफ्रिकेतील अन्य सुंदर पक्ष्यांसह, सर्वात मोठ्या पक्ष्यांच्या जाती, शहामृग पाहा!

पार्कमध्ये पक्ष्यांसाठी रेनफॉरेस्ट व तळ्यांपासून वाळवंट व खडकाळ डेक्सपर्यंत विविध प्रकारच्या भूप्रदेशांचा समावेश आहे. प्रत्येक पक्ष्याच्या विशिष्ट गरजांसाठी अचूक ठरेल असे पर्यावरण निर्माण करण्यासाठी पार्कातील हिरवागार क्षेत्र झाडे, फर्न, झुडुपे, पाण्यातील झाडे, वृक्षवल्ली यांनी व्यापला आहे. पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासासाठी पूरक ठरण्यासाठी विशेष रोपे व झाडांच्या अंदाजे 150 जाती लावण्यात आल्या आहेत. तसेच, रेनफॉरेस्ट धिवासाच्या मायक्रो क्लायमॅटिक इकॉलॉजिकल स्थिती निर्माण होण्यासाठी फॉगर्स व मिस्टर्सचीही तरतूद करण्यात आली आहे. पक्ष्यांसाठी अशा प्रकारच्या विशेष सुविधा उपलब्ध केल्यानंतर, एस्सेलवर्ल्ड बर्ड पार्कमध्ये प्रत्येक पक्ष्याला त्याची नैसर्गिक कौशल्ये विकसित करण्याची संधी दिली जाते.

एस्सेलवर्ल्ड बर्ड पार्कमधील रेनफॉरेस्ट अधिवासाची काही ठळक वैशिष्ट्ये :

  • व्हिक्टोरिया लिली : अंदाजे 3 मीटरपर्यंत (9.8 फूट) व्यास असलेले पान असलेले फूल, त्यावर लहान मुले बसू शकतात.

  • ट्री फर्न्स : 145 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या, ज्युरासिक काळातले व भारतात अतिशय दुर्मिळ असलेले झाड बर्ड पार्कमध्ये लावलेले आहे.

  • महाराष्ट्राचे मुख्य फूल : प्राइड ऑफ इंडिया (लेजरस्ट्रोमिया स्पेसिओसा) हे एस्सेलवर्ल्ड बर्ड पार्कमधील प्रमुख आकर्षण आहे.

  • निवडुंगाचे प्रकार : ऑस्ट्रिचसाठी वाळवंटातील नैसर्गिक अधिवास निर्माण करण्यासाठी अंदाजे 20 प्रकारचे निवडुंग लावले आहेत.

खऱ्या अर्थाने नैसर्गिक, अस्सल व धमाल अनुभव मिळण्यासाठी, त्याचबरोबर पक्ष्यांचे आरोग्य व सुरक्षितता यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी एस्सेलवर्ल्ड बर्ड पार्क जगातील आघाडीचे ऑर्निथॉलॉजिस्ट्स व संवर्धक यांनी तयार केले आहे.

कंपनीविषयी
एस्सेलवर्ल्ड बर्ड पार्क — भारतातील पहिले परदेशी व संवादात्मक बर्ड पार्क — पॅन इंडिया पर्यटन प्रा. लि. या सहा अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या एस्सेल समूहाच्या मनोरंजन कंपनीच्या मालकीचे आहे व त्यामार्फत चालवले जाते. हे बर्ड पार्क देशातील सर्वात मोठ्या व पसंतीच्या थीम पार्कना पूरक आहे. थीम पार्कमध्ये समाविष्ट आहे एस्सेलवर्ल्ड – भारतातील सर्वात मोठे अॅम्युजमेंट पार्क आणि वॉटर किंग्डम – आशियातील सर्वात मोठे थीम वॉटर पार्क. जागतिक दर्जाचा एड्युटेन्मेंट अनुभव देण्यासाठी एस्सेलवर्ल्ड बर्ड पार्कचे नियोजन, डिझाइन व लँडस्केपिंग उत्तम प्रकारे केले आहे. गेल्या तीन दशकांतील, पीआयपीपीएलची उत्कृष्टतेची समृद्ध परंपरा पुढे राखत, एस्सेलवर्ल्ड बर्ड पार्क तुम्हाला जीवनभरासाठी अमर्याद थरार व आठवणी देते!

तर, एस्सेलवर्ल्ड बर्ड पार्क येथे शिकण्याचा व धमाल करण्याचा अतुलनीय प्रवास करण्यासाठी तुमचे तिकीट आजच बुक करा!