मेलॅनिस्टिक रिंग-नेक्ड फेझंट

शास्त्रीय नाव: फेशिएन्स कोल्किसस

अंदाजे 100 वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये सापडलेले व विकसित झालेले मेलॅनिस्टिक म्युटंट फेझंट म्हणजे रिंगनेक फेझंटचाच एक प्रकार आहे. ते पहिल्यांदा 1880 मध्ये नॉर्फोक, इंग्लंडमध्ये दिसले, पण याच रंगांच्या हेन्सचे सुरक्षित जतन करेपर्यंत 1920 पर्यंत त्यांचे विशिष्ट पद्धतीने प्रजोत्पादन केले जात नव्हते. या पक्ष्यांचे खऱ्या अर्थाने मूळ स्थान नसले तरी ते जंगलाच्या इकोसंस्थेचे. मैदाने व टेम्परेट वूडलँड्सचे सक्षम सदस्य बनले आहेत.

हे पक्षी स्मार्ट, सावध, समजूतदार असतात. नैसर्गिकीकरणासाठी मुक्त करण्यासाठी प्राधान्याच्या पर्यायांपैकी एक आहेत. हे पक्षी प्रामुख्याने खेळासाठी वाढवले दातात. एकत्र असताना नर उडतात. एका नरामागे 10-12 मादी जन्माला घातल्या जाऊ शकतात.

या फेझंट्सचे आयुर्मान सर्वाधिक आयुर्मानांपैकी एक आहे. पाळीव म्हणून त्यांचे सरासरी वय 9 वर्षे असते, पण वन्य जीवनात ते 15 वर्षांहून अधिक काळ जगतात.

नरांची एकूण लांबी 24 ते 25 इंच असते आणि एकूण लांबमीमध्ये त्यांची शेपटी 20 इंच असते. मादींची शेपटी लहान असते आणि त्यांची एकूण लांबी 20-25 इंच असते व शेपटी 7-8 इंच असते.

वन्यजीवनातील मेलॅनिस्टिक रिंग-नेक्ड फेझंस विविध व हंगामी अन्न खातात. 20% टक्के प्रोटिम गेम फीड लहान पक्षी व प्रजोत्पादक पक्षी यांच्यासाठी योग्य ठरते. प्रजोत्पादन न करणाऱ्या प्रौढ पक्ष्यांसाठी चिकन लेअर क्रम्ब्लस उपयुक्त ठरतात. वैविध्य व खुराक यामुळे निरोगी आयुष्य, निरोगी पक्षी निर्माण होतील.